कळमकर, खानदेशे, धामणे दाम्पत्याला ‘मराठा भूषण पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:28+5:302021-06-26T04:16:28+5:30

अहमदनगर : जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मराठा समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना ...

Kalamkar, Khandeshe, Dhamne couple to receive 'Maratha Bhushan Award' | कळमकर, खानदेशे, धामणे दाम्पत्याला ‘मराठा भूषण पुरस्कार’

कळमकर, खानदेशे, धामणे दाम्पत्याला ‘मराठा भूषण पुरस्कार’

अहमदनगर : जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मराठा समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा मराठा भूषण जीवन गौरव पुरस्कार यावर्षी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे आणि मानसिक विकलांग महिलांसाठी काम करणारे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना जाहीर झाला आहे. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार ठुबे व उपाध्यक्ष सतीश इंगळे म्हणाले, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज मराठा भूषण जीवन गौरव हा पुरस्कार सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नगर शहराचे माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर तसेच सामाजिक, शैक्षणिक, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजाला भूषण ठरावे असे आदर्शवत काम करणारे डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सुचेता धामणे यांना ‘छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. लवकरच पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

............

२५ मराठा

Web Title: Kalamkar, Khandeshe, Dhamne couple to receive 'Maratha Bhushan Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.