ज्येष्ठांचा भन्नाट सूर!

By Admin | Updated: September 20, 2014 23:23 IST2014-09-20T23:18:08+5:302014-09-20T23:23:00+5:30

अहमदनगर : वाडियापार्क येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसावर ज्येष्ठ खेळाडूंच्या भन्नाट सूराने मोहर उमटवली़

Jr | ज्येष्ठांचा भन्नाट सूर!

ज्येष्ठांचा भन्नाट सूर!

अहमदनगर : वाडियापार्क येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसावर ज्येष्ठ खेळाडूंच्या भन्नाट सूराने मोहर उमटवली़ वाढत्या वयातही तंदुरुस्ती राखणाऱ्या या जलतरणपटूंचा प्रत्येक स्ट्रोक ताकदीचा आणि तेवढाच लयदार होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी त्यांचे प्रोस्ताहन वाढवत जिंकण्याच्या इर्षेला दाद दिली.
राज्य जलतरण संघटना व जिल्हा जलतरण संघटना आणि मास्टर्स अ‍ॅक्केरिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ स्पर्धेत २५ ते ९० वयोगटातील खेळाडू सहभागी झाले आहेत़ शनिवार व रविवार अशी दोन दिवस स्पर्धा होणार आहेत़ पहिल्या दिवशी सकाळी १२ वाजेच्या सुमारास फ्री स्टाईल आणि ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात ज्येष्ठ वयोगटातील खेळाडुंची कामगिरी लक्षवेधी ठरली़ स्पर्धेत ४१० पुरुष व ७० महिला खेळाडुंनी सहभाग नोंदविला आहे़ नगरसह राज्यातील नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, वर्धा, अकोला, जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत़ या स्पर्धेत फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरप्लाय स्ट्रोक, वैयक्तीक मिडले, रिले व डयव्हिंग आदी प्रकारांचा समावेश आहे़ स्पर्धेतील प्रथम, द्वितीय तृतीय येणाऱ्या खेळाडुंना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्रदान करण्यात येणार आहेत़ या स्पर्धेमधून नोव्हेंबरमध्ये हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे़
दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य जलतरण स्पर्धेचे राज्य सचिव किशोर वैद्य, संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले, गजानन चव्हाण, रावसाहेब बाबर, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)

Web Title: Jr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.