परप्रांतीय चार भावडांना जलसमाधी; श्रीगोंदा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:28 IST2020-06-23T16:27:42+5:302020-06-23T16:28:26+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्या चार भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना आज (२३ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

परप्रांतीय चार भावडांना जलसमाधी; श्रीगोंदा तालुक्यातील घटना
श्रीगोंदा : तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्या चार भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना आज (२३ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील काही जोडपी बाबुर्डी येथील एका गुºहाळावर कामाला आहेत. त्यामधील चार सख्खे भाऊ आई, वडिलांचा डोळा चुकून मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. ते चौघेही पाण्यात बुडून मरण पावले. हे चारही जण ७ ते १५ वर्षे वयोगटातील आहेत.
दरम्यान, या चारही भावडांचे चौघांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. हे सर्व परप्रांतीय असल्याने अद्याप या चौघांची नावे समजली नाहीत. या घटनेमुळे बाबुर्डी गावावर शोककळा पसरली आहे.