एकजुटीने संकटावर मात शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:14+5:302021-06-18T04:15:14+5:30

बेलापूर येथील प्राथमिक शाळेतील कोविड सेंटरचा तहसीलदार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून समारोप झाला. त्यांनी सेंटरने संकटकाळी दिलेल्या सेवेचे ...

It is possible to overcome the crisis with unity | एकजुटीने संकटावर मात शक्य

एकजुटीने संकटावर मात शक्य

बेलापूर येथील प्राथमिक शाळेतील कोविड सेंटरचा तहसीलदार पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून समारोप झाला. त्यांनी सेंटरने संकटकाळी दिलेल्या सेवेचे कौतुक केले.

ते म्हणाले, कोरोना संकटाने सर्वांनाच चिंतेत टाकले होते. अशा संकटसमयी बेलापूरकरांनी सेंटर सुरू केले. एकूण २५० रुग्णांवर मोफत औषधोपचार तसेच त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली. यामुळे शासन यंत्रणेवरचा ताण हलका झाला. समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी देणग्या देऊन तसेच अन्नदान करून दिलेले योगदानही आदर्शवत व प्रेरणादायी आहे.

शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रणजित श्रीगोड, भाऊ डाकले, देविदास देसाई, नवनाथ कुताळ, विष्णुपंत डावरे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, कामगार तलाठी कैलास खाडे, पोलीस पाटील अशोक प्रधान, मच्छिंद्र निर्मळ, सुधीर काळे, रवींद्र गंगवाल, शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, जालिंदर कुऱ्हे, भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, प्रवीण लुक्कड, पंकज हिरण, यादव काळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, बाळासाहेब दाणी, मोहसिन सय्यद, अशोक राशिनकर, अकबर सय्यद उपस्थित होते.

--------

Web Title: It is possible to overcome the crisis with unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.