रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ईश्वर बोरा, सचिवपदी दिलीप बागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:33+5:302021-07-08T04:15:33+5:30

नूतन कार्यकारिणीमध्ये क्लब ट्रेनरपदी राजीव गुजर, प्रेसिडेंट इलेक्ट-विक्रम मुथा, खजिनदारपदी धीरज मुनोत, आयपीपी-प्रसन्न खाजगीवाले, सारजेंट ॲट आर्मस-सतीश कटारिया, सहसचिवपदी ...

Ishwar Bora as President of Rotary Club and Dilip Bagal as Secretary | रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ईश्वर बोरा, सचिवपदी दिलीप बागल

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ईश्वर बोरा, सचिवपदी दिलीप बागल

नूतन कार्यकारिणीमध्ये क्लब ट्रेनरपदी राजीव गुजर, प्रेसिडेंट इलेक्ट-विक्रम मुथा, खजिनदारपदी धीरज मुनोत, आयपीपी-प्रसन्न खाजगीवाले, सारजेंट ॲट आर्मस-सतीश कटारिया, सहसचिवपदी संजय गारुडकर, टीआरएफ-मनीष बोरा तर पब्लिक इमेजची जबाबदारी सागर पंजाबी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बोरा हे मागील कार्यकारिणीत सचिवपदी कार्यरत होते. जैन ओसवाल पतसंस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच व्यापारी असोसिएशन, आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ॲाफ इंडिया, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान आदी संस्थेत ते कार्यरत आहेत. क्लबच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भरीव सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे बोरा यांनी सांगितले. नूतन पदाधिकाऱ्यांचे क्लबचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, माजी प्रांतपाल शिरीष रायते, चार्टर मेंबर डॉ. एस. व्ही. जोशी यांनी कौतुक केले आहे.

----------

फोटो ०७ ईश्वर बोरा, दिलीप बागल

Web Title: Ishwar Bora as President of Rotary Club and Dilip Bagal as Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.