शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

हत्यारांसह इराणी टोळी पकडली, पाच आरोपींचा समावेश : चारचाकीसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघालेली पाचजणांची इराणी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सावेडीतील भिस्तबाग परिसरात हत्यारांसह पकडली. त्यांच्याकडून एक चारचाकी गाडीसह हत्यारे, मोबाईल असा अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघालेली पाचजणांची इराणी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सावेडीतील भिस्तबाग परिसरात हत्यारांसह पकडली. त्यांच्याकडून एक चारचाकी गाडीसह हत्यारे, मोबाईल असा अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नगर शहरातील सावेडी भागात दरोडा टाकण्यासाठी ही इराणी टोळी येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खबºयामार्फत मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची योजना आखली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दोन पंचांना बोलावून घेतले. पंचासह गुन्हे शाखेचे मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, सुरेश माळी, रणजित जाधव, चालक संभाजी कोतकर  यांच्या पथकाने सावेडीतील तपोवन रस्त्यावर भिस्तबाग महाल परिसरात सापळा लावला. रात्री पावणेनऊच्या सुमारास एस संशयित कार कॉटेज कॉर्नर रोडकडील बाजूने येताना पोलिसांना दिसली. खबºयाने वर्णन केलेली ती हीच कार असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने गाडीला घेराव घालून गाडी थांबवली. पोलिसांनी गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे राजेश बबन देशमुख (कारचालक- वय २४, राहुरी), कंबर रहिम मिर्झा (वय ३१, श्रीरामपूर), जफर मुक्तार शेख (वय २९, सुभेदार गल्ली, श्रीरामपूर), जाकीर ऊर्फ जग्ग्या युनूस खान (वय २५, इराणी गल्ली, श्रीरामपूर), अनिल रावसाहेब चव्हाण (वय २०, दत्तनगर, राहुरी) अशी सांगितली. पोलिसांची आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक स्टीलचा सत्तूर, एक चाकू, तीन लाकडी दांडके, पाच मोबाईल आढळले. पोलिसांनी हा मुद्देमाल व त्यांच्याकडील होंडा सिटी कार (एमएच ०२ बीडी ३०८५) असा एकूण २ लाख ५१ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत जात असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींवर तोफखाना पोलिसांत भादंवि ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-----------तीन आरोपींवर ३८ गुन्हे इराणी टोळीतील आरोपी कंबर रहीम मिर्झा याच्यावर १५, जाकीर खान याच्यावर २०, तर जफर शेख याच्यावर ४ असे या तिघांवर एकूण ३८ गुन्हे धुळे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांसह परराज्यातही दाखल आहेत.