श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी अभिनव आंदोलन; एक हजार पोस्ट कार्ड रवाना 

By शिवाजी पवार | Updated: July 1, 2023 16:55 IST2023-07-01T16:55:06+5:302023-07-01T16:55:13+5:30

स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना एक हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात आले.

Innovative Movement for Srirampur District Demand One thousand post cards sent | श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी अभिनव आंदोलन; एक हजार पोस्ट कार्ड रवाना 

श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी अभिनव आंदोलन; एक हजार पोस्ट कार्ड रवाना 

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना एक हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात आले. शिर्डी येथे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे हलविण्याची मागणीही याद्वारे करण्यात आली आहे.

 यावेळी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे सुभाष त्रिभुवन, संदीप मगर, बाबा शिंदे, अरुण नाईक, अहमद जहागीरदार आदी सदस्य उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात बंद पाळण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांना इमेल करण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले होते. आता पोस्ट कार्डद्वारे भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने पोस्ट कार्ड पाठविण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.
 

Web Title: Innovative Movement for Srirampur District Demand One thousand post cards sent