पावसाळा तोंडावर, मनपाच्या पोकलेनला मिळेना चालक, महासभेत नगरसेवक आक्रमक
By अण्णा नवथर | Updated: May 9, 2023 13:55 IST2023-05-09T13:54:48+5:302023-05-09T13:55:16+5:30
पालिका ठेकेदाराला चालविला देण्याचा केला आरोप

पावसाळा तोंडावर, मनपाच्या पोकलेनला मिळेना चालक, महासभेत नगरसेवक आक्रमक
अहमदनगर: महापालिकेने नव्याने खरेदी केलेले पोकलेन गेल्या आठ महिन्यांपासून चालका अभावी जागेवरच उभे आहेत. असे असताना नालेस सकाळी ठेकेदारांमार्फत का केली जात आहे. महापालिका ठेकेदाराला चालवायला द्यायची आहे का असा आरोप नगरसेवकांनी प्रशासनावर केला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवकांनी नालेस्फाईचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. महापालिकेने नवीन दोन पोकलेन खरेदी केले आहेत. ते गेल्या काही महिन्यांपासून जागेवरच उभे आहेत ,असे असताना ठेकेदारामार्फत नालेसफाई कशासाठी असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.