नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

By अरुण वाघमोडे | Updated: June 3, 2023 17:23 IST2023-06-03T17:23:11+5:302023-06-03T17:23:40+5:30

राऊत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

In the ahmednagar, Shiv Sainiks agitation against MP Sanjay Raut | नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

अहमदनगर: पत्रकारांसमोर थुंकून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अवमान केल्याबद्दल शहरात शिवसैनिकांच्यावतीने (शिंदे गट) शनिवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. येथील दिल्ली गेटसमोर हे आंदाेलन करण्यात आले. राऊत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

या आंदोलनात शिवसेेनेच दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबुशेट टायरवाले, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, नगरसेवक मदन आढाव, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उपजिल्हाप्रमुख काका शेळके, महेश लोंढे, अनिल लोखंडे, सागर काळे आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले संजय राऊत यांची राजकारणात गलिच्छ अशी प्रतिमा तयार झाली आहे. ते सकाळपासूनच माध्यमांसमोर बडबडायला लागतात. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचे काम राऊत यांनीच केले आहे. त्यांचे वर्तन असेच राहिले तर येणाऱ्या काळात त्यांच्याच भाषेत आम्ही पण उत्तर देऊ असे ते म्हणाले.यावेळी बाबुशेट टायरवाले यांनीही राऊत यांच्या कृत्याचा निषेध केला.

Web Title: In the ahmednagar, Shiv Sainiks agitation against MP Sanjay Raut