अहमदनगरमध्ये पोलिसदादांचा पारा चढला, एकमेकांना खुले चॅलेंज
By अण्णा नवथर | Updated: April 20, 2023 16:35 IST2023-04-20T16:33:44+5:302023-04-20T16:35:48+5:30
अहमदनगर येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठी गर्दी जमली होती.

अहमदनगरमध्ये पोलिसदादांचा पारा चढला, एकमेकांना खुले चॅलेंज
अहमदनगर: तोफखाना पोलास ठाण्यात रात्र पातळीसाठी नियुक्तीस असलेल्या एका ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांचा चांगलाच पारा चढला. त्यांनी दुसऱ्या पोलिसदादांना शिविगाळ करत थेट विकत घेण्याचेच चॅलेंज केले. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने एकाच गोंधळ उडाला होता.
अहमदनगर येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मोटार सायकलवरून काही आरोपी पकडून आणलेले होते. त्यांच्यात चर्चा सुरू होती. दरम्यान पोलिस ठाण्यात रात्र पाळीसाठी नियुक्तीस असलेले पोलिस धावत बाहेर आले. त्यांनी पोलिस ठाण्यातून निघालेली चारचाकी थांबविली.
चारचाकी थांबविताच त्यांनी तु कुठे निघालास, अशी विचारणा करत चालका शेजारी बसलेल्या पोलिसदांदांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. दोन पोलिसांतील हा वाद चांगलाच चिघळला. मोठ- मोठ्याने शिविगाळ आणि ते दोन पोलिसांमध्येच, हा काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी तिथे गर्दी जमली. दरम्यान वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मध्यस्थी करत चारचाकीतून एकाला काढून दिले. त्यामुळे वाद निवळला.या वादामागील नेमकं कारण समजू शकलं नाही.