..अन् ग्रामपंचायतीत बसविली शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:00+5:302021-03-21T04:20:00+5:30
निघोज : हटविलेली शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा निघोज ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी हटविली होती. पारनेर तालुक्यातील निघोज येथील ग्रामपंचायतीमधील शिवराज्याभिषेक ...

..अन् ग्रामपंचायतीत बसविली शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा
निघोज : हटविलेली शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा निघोज ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी हटविली होती. पारनेर तालुक्यातील निघोज येथील ग्रामपंचायतीमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हटविली होती.
पारनेर तालुक्यातील निघोज येथील ग्रामपंचायतीमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हटविली होती. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांनी मासिक सभेमध्ये ठराव करून शिवराज्याभिषेकाची प्रतिमा पुन्हा त्या जागेवर बसविण्याच्या सूचना केल्या. मात्र ग्रामपंचायतीने कार्यालयाने कोणतीही कार्यवाही न केल्याने नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे बेमुदत उपोषण करणाचा इशारा दिला होता. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा पुन्हा बसविण्यात आल्याने उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, शंकर गुंड, दिगंबर लाळगे, गणेश कवाद, भरत रसाळ, योगेश वाव्हळ, अविता वरखडे, भावना साळवे, ज्योती पांढरकर आदींनी दिली. माजी सरपंच ठकाराम लंके, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, खंडुजी भुकन, विठ्ठलराव कवाद, सतीश साळवे आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक निकम यांनी बंदोबस्त ठेवला होता.
---
२० निघोज निवेदन
निघोज ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा बसविण्याची मागणी करणारे निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य.