कोरोना पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा भाजपचे आदिवासी जनजाती राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांनी कोतूळ व ब्राम्हणवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरचा वैद्यकीय आढावा घेतला. यावेळी तालुक्यात सध्या प्रत्येक आरोग्य केंद्र, कोरोना उपचार केंद्र, मदत, शासकीय अनुदाने या पार्श्वभूमीवर श्रेयवादाचे गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही उपचार केंद्राला औषध व आरोग्य सुविधा कमी पडू देणार नसल्याचे पिचड म्हणाले. यावेळी उद्योजक नितीन गोडसे, मराठा महासंघाचे राजेंद्र गवांदे, उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य भारत आरोटे, संजय गायकर, पोपट हांडे , बाळासाहेब शिंदे, चंद्रकांत गोंदके, अमोल गोडसे आदी उपस्थित होते.
जिवंत राहिलो तर जरूर राजकारण करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST