गोळ्या घालून पतीचा खून<bha>;</bha> पत्नीला सात वर्षांनंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:18 IST2020-12-25T04:18:01+5:302020-12-25T04:18:01+5:30
शेवगाव : बंदुकीतून दोन गोळ्या घालून पतीचा जीव घेणाऱ्या पत्नीला तब्बल सात वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

गोळ्या घालून पतीचा खून<bha>;</bha> पत्नीला सात वर्षांनंतर अटक
शेवगाव : बंदुकीतून दोन गोळ्या घालून पतीचा जीव घेणाऱ्या पत्नीला तब्बल सात वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना ८ सप्टेंबर २०१३ रोजी शेवगावमधील शास्त्रीनगर येथे घडली होती. शांताबाई रामचंद्र सातपुते, असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
०८ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास शेवगाव शहरातील शास्त्रीनगर येथे रामचंद्र ऊर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना पिस्टलच्या दोन गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पत्नीचा सहभाग असल्याचे पुढे आल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन मयताची पत्नी शांताबाई रामचंद्र ऊर्फ रामजी सातपुते हिच्याविरुद्ध ३० डिसेंबर २०१७ रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी गुन्ह्याचा तासात करून आरोपीला अटक केली आहे. तपासात बॅलेस्टिक एक्स्पर्ट, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई यांच्याकडून अभिप्राय प्राप्त करून घेतला होता. त्यामुळे आरोपी शांताबाई रामचंद्र ऊर्फ रामजी सातपुते (मयताची पत्नी) हिला बुधवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने दिनांक २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन दराडे, पोलीस नाईक संजय बडे, महिला पोलीस कर्मचारी रोहिणी घरवाढवे यांनी केला आहे.