पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने केली आत्महत्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:29 IST2020-07-15T11:28:42+5:302020-07-15T11:29:22+5:30

पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणाने तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना राहाता तालुक्यातील को-हाळे गावात घडली.

Husband commits suicide as wife is not coming | पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने केली आत्महत्या...

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने केली आत्महत्या...

राहाता : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणाने तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना राहाता तालुक्यातील को-हाळे गावात घडली.

 अनिल काशिनाथ खरात (वय २३) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने दि.१२ जुलै रोजी दोन वाजण्यापूर्वी घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची पत्नी माहेरी निघून गेली असून ती नांदायला येत नसल्याच्या कारणातून त्याला नैराश्य आले होते. या कारणातून  त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नरोडे हे करीत आहेत. 

Web Title: Husband commits suicide as wife is not coming