श्रीगोंदा पोलीस ठाण्यातच तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:51 IST2018-05-04T16:51:05+5:302018-05-04T16:51:38+5:30

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने तुफान चोप दिला. श्रीगोंदा शहरातील मेहुण्यांमध्ये ही तुफान हाणामारी ठाणे अंमलदारासमोर झाली. एकमेकांना लाथा- बुक्याने तुफान हाणामार करण्यात आली. ही घटना शुकवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

Hurricane strike in Shrigonda police station | श्रीगोंदा पोलीस ठाण्यातच तुफान हाणामारी

श्रीगोंदा पोलीस ठाण्यातच तुफान हाणामारी

ठळक मुद्देमारहाण करणारांमध्ये एक सेवानिवृत्त पोलिस

श्रीगोंदा : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने तुफान चोप दिला. श्रीगोंदा शहरातील मेहुण्यांमध्ये ही तुफान हाणामारी ठाणे अंमलदारासमोर झाली. एकमेकांना लाथा- बुक्याने तुफान हाणामार करण्यात आली. ही घटना शुकवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.
अधिक माहिती अशी की, एक जोडपे नातेवाईकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. ठाणे अंमलदार समोर बसले असता एक गट पोलिस स्टेशनमध्ये घुसला आणि या दोघांना जबर मारहाण केली. ही मारामारीमुळे पोलिसांची धावपळ उडाली. चोरून दुसरे लग्न केल्याचा राग धरुन मारहाण करण्यात आली. मारहाण करणारांमध्ये एक सेवानिवृत्त पोलिस असल्याचे समजते. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

 

Web Title: Hurricane strike in Shrigonda police station