दीडशे गावांना टँकरने पाणी
By Admin | Updated: March 9, 2016 00:29 IST2016-03-09T00:19:02+5:302016-03-09T00:29:02+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील पाणीपातळी खालावली असून, सरकारी विहिरींनी तळ गाठला आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, दीडशे गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़

दीडशे गावांना टँकरने पाणी
अहमदनगर : जिल्ह्यातील पाणीपातळी खालावली असून, सरकारी विहिरींनी तळ गाठला आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, दीडशे गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ टँकरची संख्या पुढील महिन्यात अणखी वाढण्याची चिन्हे आहेत़
उन्हाळाचा तडाखा वाढू लागला आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तालुका मुख्यालयांसह ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढत आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज किमान ५ ते ६ गावांचे टँकरचे प्रस्ताव दाखल होत आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १५८ गावे व ७७७ वाड्या- वस्त्यांवरील ३ लाख ९५ हजार २०१ नागरिकांना टँकरद्वारे पिण्यचे पाणी पुरविले जात आहे़ जिल्ह्यातील अकोले, श्रीरामपूर आणि राहुरी तालुका वगळता इतर तालुक्यात कमी- अधिक प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे़ दक्षिण नगर जिल्ह्यात ही संख्या अधिक आहे़ दक्षिण नगर जिल्ह्यासाठी कुकडी धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे़ उद्भव कोरडे पडल्यामुळे टँकर भरायचे कुठे, असा प्रश्न या भागात निर्माण झाला आहे़ खरिपाचे पीक वाया गेले़ खरिपाची ५८१ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहे़ या गावांत दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत़ दुष्काळावर विविध उपाययोजना आहेत़ परंतु टँकर वगळता इतर उपाययोजना करण्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे़ सर्वाधिक टँकर कर्जत व पाथर्डी तालुक्यात आहेत़ या दोन्ही तालुक्यात कमी पाऊस पडल्याने टँकरची संख्या वाढत आहे़