तृतीयपंथीयांचा भिंगारला यात्रौत्सव
By Admin | Updated: July 17, 2014 00:32 IST2014-07-16T23:44:45+5:302014-07-17T00:32:10+5:30
भिंगार : राज्यातील आगळ्या वेगळ्या तृतीय पंथीयांच्या काळूबाई छबिना यात्रेला दुपारी तीन वाजता उत्साहात प्रारंभ झाला. या यात्रेसाठी राज्यातून तृतीयपंथी भिंगार शहरात झाले दाखल झाले होते.

तृतीयपंथीयांचा भिंगारला यात्रौत्सव
भिंगार : राज्यातील आगळ्या वेगळ्या तृतीय पंथीयांच्या काळूबाई छबिना यात्रेला दुपारी तीन वाजता उत्साहात प्रारंभ झाला. या यात्रेसाठी राज्यातून तृतीयपंथी भिंगार शहरात झाले दाखल झाले होते. या यात्रेची चाँदबिबीच्या काळापासून परंपरा असल्याचे सांगितसे जाते. काळूबाई व लक्ष्मीआईच्या यात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
भिंगार येथील सदर बाजारापासून यात्रेस प्रारंभ झाला. मिरवणुकीत काळूबाईची मूर्ती सजवलेल्या रथात स्थापन करण्यात आली. त्या रथात तृतीय पंथीयांच्या राष्ट्रीय अध्यक्ष काजलगुरु विराजमान झाल्या होत्या. वाद्य गजरात निघालेल्या यात्रेत आराधी, जोगते, पोतराज, वाघे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रथापुढे तृतीय पंथीयांनी नृत्य सादर केले. राज्यातील नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती.
सदर बाजार, भिंगार वेशीमार्गे भिंगारनाल्याजवळील गोगादेव मंदिराजवळ आल्यावर विधिवत पूजा करून यात्रेची सांगता झाली. वाद्याच्या तालावर थिरकरणारी पावले व देवीची भक्तिगीते या यात्रेचे आकर्षण ठरले. मिरवणुकीदरम्यान रस्ते दुतर्फा गर्दीने फुलले होते. पोलीस बंदोबस्त असला तरी खराब रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी प्रचंड झाली होती. (वार्ताहर)