खरवंडीत आशासेविकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:05+5:302021-03-09T04:23:05+5:30
नेवासा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खरवंडीच्या भोगेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी महिला दिन साजरा ...

खरवंडीत आशासेविकांचा सन्मान
नेवासा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खरवंडीच्या भोगेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी आशासेविकांचा सन्मान करण्यात आला.
विविध आरोग्यविषयक शिबिरे राबविणे, शाळेतील मुलांना माहिती देणे, गोळ्या पुरविणे, कोरोना जनजागृतीसाठी लोकांना काळजी घेण्यास सांगणे अशी विविध जोखमीची कामे आशासेविकांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे आशासेविकांचा शिक्षिकांनी सन्मान केला. शोभा लोहकरे, सरिता काळे, मंगल कांदे यांच्या हस्ते आशासेविकांना गौरविण्यात आले.
यावेळी मीरा भोगे, मंदा भोगे, ज्योती भोगे, संगीता भोगे, राधा कंक, अलका सिनारे, शांता सिनारे, लता टेमक, सुंदरबाई ब्राम्हणे उपस्थित होत्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापक मच्छिंद्र इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका विद्या गवळी यांनी केले. ज्योती भोगे यांनी आभार मानले.
--
०८ भोगेवस्ती शाळा