मुख्याध्यापक रघुनाथ झिने यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:33+5:302021-02-05T06:35:33+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील शेंडी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ झिने यांच्या सेवापूर्तीनिमित्त उच्च व तंत्र ...

मुख्याध्यापक रघुनाथ झिने यांचा सन्मान
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील शेंडी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ झिने यांच्या सेवापूर्तीनिमित्त उच्च व तंत्र व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव जी.डी. खान्देशे हाेते. यावेळी संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी, जयंत वाघ, मुकेश मुळे, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, गोविंद मोकाटे, सरपंच सीताराम दाणी, केशव बेरड, आप्पासाहेब शिंदे, संदेश कार्ले, नगरसेवक निखिल वारे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, बापूसाहेब गायकवाड, सीताराम ढोकणे, अजय गुंड आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक झिने यांनी शेंडी विद्यालयास ५१ हजार रुपये रोख व लॅपटॉप, चास येथील विद्यालयास ११ हजार रुपये देणगी दिली. प्रास्ताविक बी.वाय. भिसे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार उद्धव काळापहाड यांनी मानले.