भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने नगरमध्ये महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:12 IST2020-06-24T15:10:43+5:302020-06-24T15:12:16+5:30
कोरोना लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने नगरमध्ये महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी
अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.
या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, आयटकचे जिल्हा सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, विडी कामगार नेते कॉ. शंकर न्यालपेल्ली, कॉ. भैरवनाथ वाकळे, दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, संतोष गायकवाड, विजय केदारे, अंबादास दौंड, चंद्रकांत माळी, रवींद्र वाबळे, महादेव कोलते व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या संकटात नागरिक होरपळले जात असताना महावितरणकडून ग्राहकांची लुबाडणूक सुरु असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
महावितरणाने दिलेली जादा रकमेची अवास्तव वीज बिले मागे घेऊन सरकारने या काळातील वीज बिले माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.