क्षणचित्रे --कोरोनाची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:24+5:302021-03-13T04:36:24+5:30

१२ मार्च- कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. १२ मार्च- सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे बंद, जमावबंदीचा आदेश १७ मार्च-शिर्डीचे साईमंदिर ७९ वर्षात ...

Highlights - Corona's full year | क्षणचित्रे --कोरोनाची वर्षपूर्ती

क्षणचित्रे --कोरोनाची वर्षपूर्ती

१२ मार्च- कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. १२ मार्च- सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे बंद, जमावबंदीचा आदेश

१७ मार्च-शिर्डीचे साईमंदिर ७९ वर्षात प्रथमच बंद

१९ मार्च- जिल्ह्यात लॉकडाऊनचा पहिला आदेश

२२ मार्च-पहिला कडकडीत लॉकडाऊन (जनता कर्फ्यू)

२४ मार्च- देशभरातील २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर

१० एप्रिल- कोरोनाचा पहिला बळी, श्रीरामपूरच्या रुग्णाचे निधन

--------------

जिल्हा रुग्णालय ते पुणे प्रयोगशाळा

संशयित आणि संपर्कातील व्यक्तींच्या थुंकीचे नमुने जिल्हा रुग्णालयात घेतले जात होते. हे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविले जात होते. पहिल्या दिवशी नमुने पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा अहवाल दिला जायचा. निगेटिव्ह आलेल्यांची आधी माहिती दिली जायची. नंतर पॉझिटिव्ह आलेल्यांची माहिती दिली जात होती. पुणे येथून येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा असायची. त्यामुळे एक-दोन दिवस संशयितांचा जीव टांगणीला लागायचा. नंतर लष्करी रुग्णालयात तपासणीला पाठवली जायची.

--------------

Web Title: Highlights - Corona's full year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.