शिक्षेचा आलेख उंचावला
By Admin | Updated: June 26, 2023 12:12 IST2014-05-12T00:33:01+5:302023-06-26T12:12:53+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ विविध सत्र न्यायालयात वर्षभरात ३६ टक्के गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा झाली आहे.

शिक्षेचा आलेख उंचावला
अहमदनगर: जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ विविध सत्र न्यायालयात वर्षभरात ३६ टक्के गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा झाली आहे. मागील काही वर्षांच्या शिक्षेचे प्रमाण पाहता यंदा शिक्षा मिळण्याचा आलेख उंचावला असून भविष्यातही यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंगे आणि जिल्हा सरकारी वकील सतीष पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात नगरसह श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि नेवासा येथे सत्र न्यायालय आहे़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४९ आहेत़ या न्यायालयातील विविध गुन्ह्यांची निकाली माहिती घेतली़ न्यायालयांनी दिलेल्या महितीनुसार आरोपींना सन २००४ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २़ ५८ टक्के होते़ हे प्रमाण यंदा २०़२ टक्यांवर पोहोचले आहे़ यावरून जिल्ह्यातील पोलिसांचे सहकार्य, सरकारी वकीलांचा सक्षमपणा, साक्षीदरांचे सहकार्य, वैद्यकीय अधिकार्यांचे सहकार्य, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त केल्याने हे शक्य झाले आहे़ श्रीरामपूर सत्र न्यायालयात अंबिका डुकरे हिच्या हत्या संबंधित आरोपीस फाशीची शिक्षा झाली़ जेऊर टोलनाका येथे अनिल लाजरस शिंदे यांच्या हात्येप्रकरणातील आरोपींना जन्मठेप झाली़ मुनोत खून खटल्यात सहा आरोपींना जन्मठेप झाली,यासारख्या विविध गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झाली आहे़आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढत असून,भविष्यात ते आणखी वाढेल,असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)