नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात  अतिवृष्टी: पिके पाण्याखाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 16:34 IST2020-07-31T16:33:34+5:302020-07-31T16:34:16+5:30

अहमदनगर जिल्ह्यात नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी (३० जुलै) रात्री अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढ्यानालांना पूर आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.

Heavy rains in Nevasa, Pathardi, Shevgaon talukas: Crops under water ... | नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात  अतिवृष्टी: पिके पाण्याखाली...

नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात  अतिवृष्टी: पिके पाण्याखाली...

अहमदनगर : जिल्ह्यात नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी (३० जुलै) रात्री अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढ्यानालांना पूर आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.

नेवासा शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. पावसाने ओढ्या नाल्यांना अक्षरश: पूर आला होता. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडाळा मंडल विभागामध्ये सर्वाधिक १३५ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. नेवासा खुर्द येथे १२० तर सलाबतपूर येथे १२६ मिलीमीटर एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. 

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे औरंगाबाद-बारामती महार्गावर कच्चा पूल वाहून गेला आहे.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्व पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. 

Web Title: Heavy rains in Nevasa, Pathardi, Shevgaon talukas: Crops under water ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.