मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाची जोरदार हजेरी; ५ हजार क्युसेकने नदीपात्रात सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 12:01 IST2020-10-23T11:55:06+5:302020-10-23T12:01:07+5:30
मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून ५ हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाची जोरदार हजेरी; ५ हजार क्युसेकने नदीपात्रात सोडले पाणी
राहुरी : मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणातून ५ हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत धरणातून जायकवाडी कडे १५ हजार १५४ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर असलेल्या पारनेर भागातून आणि कोतुळ खालील भागातून धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची आवक सुरू आहे. कोतुळ येथून पाण्याची आवक बंद आसली तरी अन्य ठिकाणाहून पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने पाण्याचा विसर्ग २ हजार क्युसेकवरून ५ हजार क्युकेस करण्यात आला आहे. नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर व कोतुळ खालील भागातील पाण्याची आवक कालपासून सुरू आहे. गुरुवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत मुळा धरणात ३७ हजार १६८ दशलक्ष घनफूट पाण्याची झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाण्याची पातळी स्थिर ठेवून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे, असे धरणाचे अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.