पठारवाडी परिसरात जोरदार पाऊस, वाऱ्याने झाडे पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:26+5:302021-07-08T04:15:26+5:30
पारनेर तालुक्यातील शिरूर-जवळे-निघोज या मुख्य रस्त्यालगत मेसे मळ्यात अनेक वर्षांची जुनी बाभूळ, आंब्याची झाडे होती. बुधवारी दुपारी झालेल्या ...

पठारवाडी परिसरात जोरदार पाऊस, वाऱ्याने झाडे पडली
पारनेर तालुक्यातील शिरूर-जवळे-निघोज या मुख्य रस्त्यालगत मेसे मळ्यात अनेक वर्षांची जुनी बाभूळ, आंब्याची झाडे होती. बुधवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे व वाऱ्यामुळे या परिसरातील झाडे उन्मळून पडल्याने मुख्य रस्ता काही काळासाठी बंद झाला होता. तसेच महावितरणच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जवळेचे माजी ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ पठारे, भाजपचे तालुका सरचिटणीस नवनाथ सालके, प्रदीप पठारे यांनी तत्काळ जेसीबी बोलावून रस्ता खुला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवून दुरूस्तीसाठी वीज पुरवठाही खंडित करण्यात आला.
मेसे वस्तीवरील वसंत सोन्याबापू पठारे यांनी नेहमीप्रमाणे घरापुढे दुचाकी लावली होती. झाड पडल्याने या दुचाकीचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या दुकानचे शेडही जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडले.
पठारवाडी फाट्यावर आंबा, बाभूळ असे सात ते आठ झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
-------
०७ जवळे झाड
जवळे-पठारवाडी परिसरात झालेल्या जोरदार पाऊस, वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यालगतच असणारी झाडे उन्मळून पडली.