संगमनेर शहरातील सर्व कुटुंबांचे होणार आरोग्य सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:21+5:302021-04-23T04:22:21+5:30
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या परवानगीने आरोग्य सर्वेक्षण मोहीम या अभियानांतर्गत संगमनेर शहरातील सर्व नागरिकांचे गृहभेटीदरम्यान ...

संगमनेर शहरातील सर्व कुटुंबांचे होणार आरोग्य सर्वेक्षण
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या परवानगीने आरोग्य सर्वेक्षण मोहीम या अभियानांतर्गत संगमनेर शहरातील सर्व नागरिकांचे गृहभेटीदरम्यान सर्वेक्षणासाठी प्रत्येक प्रभागनिहाय पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरात १४ प्रभाग असून त्यासाठी २८ पथके स्थापन करत ५३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वेक्षणात कुटुंबप्रमुखाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, कुटुंब सदस्य संख्या, सर्दी, खोकला, तापाने आजारी रुग्णसंख्या, हाय बी.पी. शुगर असलेली संख्या, को-मॉरबीड संख्या, गर्भवती महिला याबाबत नोंद करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना तपासणीकरिता शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. डॉ. अमोल जंगम, डॉ. शाकीब बागवान यांना सर्वेक्षणात आजाराचे लक्षण आढळून आलेल्या नागरिकांना मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.