शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक दोषामुळे हस्तलिखित

By admin | Updated: December 15, 2015 23:15 IST

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व्हर सिस्टीममध्ये झालेला दोष मंगळवारीही कायम राहिल्याने हस्तलिखित उमेदवारी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली.

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर करण्याबाबत सर्व्हर सिस्टीममध्ये झालेला दोष मंगळवारीही कायम राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये हस्तलिखित (आॅफलाईन) उमेदवारी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली. मंगळवारी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची तसेच २६० उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातून देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सर्व्हर सिस्टीममधील विविध दोषामुळे सोमवारी संगणकावर दाखल झालेले काही उमेदवारी अर्ज तपासण्यात आले व त्यानंतर सिस्टीममधील त्रुटीबाबत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना याबाबत लेखी पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांनी माहिती दिली. मंगळवारी दुपारपर्यंत हा गोंधळ सुरू राहिल्याने विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करण्याची मागणी नोंदविली. दरम्यान, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कावरे यांनी राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार हस्तलिखित (आॅफलाईन) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना इच्छुकांना देण्यात आल्या. त्यानंतर निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्जाचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मंगळवारी २६० अर्जांचे वाटप झाल्याची माहिती मंडळाधिकारी नितीन बनसोडे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)