अहोरात्र राबताहेत आरोग्य विभागाचे हात, त्यांना हवीय नागरिकांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:43+5:302021-04-23T04:22:43+5:30
शेवगाव : सद्य परिस्थितीत घराच्या चार भिंतींच्या आड कोरोना संसर्गामुळे असुरक्षित असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात घुटमळत आहे. ...

अहोरात्र राबताहेत आरोग्य विभागाचे हात, त्यांना हवीय नागरिकांची साथ
शेवगाव : सद्य परिस्थितीत घराच्या चार भिंतींच्या आड कोरोना संसर्गामुळे असुरक्षित असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात घुटमळत आहे. अशा कठीण प्रसंगी कोरोना बाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचे हजारो हात, स्वतःसह कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत.
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी हॉस्पिटल मधील शेकडो डॉक्टर, परिचारक, परिचारिका यांच्या समोरील आव्हानात्मक परिस्थितीत त्यांच्या समोरील आव्हानासमोर त्यांच्या वेदना गौण ठरत आहेत. कोरोना बाधितांचा आकडा अन उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज शेकडो बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. अशावेळी कुटुंबाची काळजी वाहत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, विना तक्रार, अंगात पीपीई किट घालून ही मंडळी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या आठ तासांत त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहेत. गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या होणाऱ्या वेदनांपुढे स्वतःच्या वेदना विसरून ही मंडळी त्यांच्या निरोगी आयुष्याकरिता परिश्रम घेत आहेत. अंगात पीपीई किट एकदा घातले की तहान, भूक, नैसर्गिक क्रिया हे सगळे निमूटपणे सहन करावे लागते आहे.
रुग्णांना काय हवे, काय नको, त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारी समजून घेताना स्वतःचे दुःख बाजूला सारून आरोग्यदायी सेवेला प्राधान्य देत आहेत. आपले कर्तव्य निभावताना घरातील सदस्यांची काळजी त्यांना सतत सतावत आहे. कित्येक महिन्यांपासून बहुतेक कर्मचारी घरच्यापासून विरक्त राहत आहेत.
उसंत, आरोग्य हरपले.
इतर व कोरोना बाधित रुग्णांवरील उपचार, लसीकरण, कोरोना चाचणी, नोंदी, दैनंदिन कार्यालयातील
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सची ड्युटी एखाद्या कमांडो ट्रेनिंगपेक्षा कमी नाही. डीसीएचसी केंद्रात पीपीई किट घालून गेल्यावर काही खाऊ शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, टॉयलेटला जाऊ शकत नाही.
............
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पीपीई किट घातल्याने असहाय्य उकाडा जाणवतो. किट एकदा घातल्यानंतर ८ ते १० तास काढणे शक्य नाही. एक क्षणही खबरदारी राखली नाही तर त्यांचा जीव धोक्यात पडू शकतो. सध्या काही कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. नागरिकांनी नियम पाळावेत, काम नसेल तर घरा बाहेर पडणे टाळावे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाला साथ द्यावी.
- डॉ. रामेश्वर काटे, वैद्यकीय अधीक्षक. शेवगाव.