निम्मा निधी घनकचऱ्यासाठी
By Admin | Updated: March 9, 2016 00:31 IST2016-03-09T00:20:05+5:302016-03-09T00:31:13+5:30
अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगातील निम्मा निधी घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करण्याकरिता महापालिकेची विशेष महासभा शुक्रवारी बोलविण्यात आली

निम्मा निधी घनकचऱ्यासाठी
अहमदनगर : हरित लवादाच्या आदेशानंतर प्रशासन व पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. चौदाव्या वित्त आयोगातील निम्मा निधी घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करण्याकरिता महापालिकेची विशेष महासभा शुक्रवारी (दि. ११) बोलविण्यात आली आहे.
नगर शहरात संकलीत होणारा कचरा बुरूडगाव रस्त्यावरील कचरा डेपोत टाकला जातो. तेथे त्याच्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. त्याची तक्रार हरित लवादाकडे केल्यानंतर त्याची सुनावणी सुरू आहे. गत सुनावणीवेळी लवादाने महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले. संरक्षक भिंत बांधण्यापासून काही सूचना दिल्या. त्या अंमलात आणण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ही बाब खर्चिक असल्याने त्याला महासभेची मान्यता घ्यावी लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातील निम्मा निधी या कामावर खर्च होणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो महापौर कार्यालयास सादर केला. त्यानंतर महापौर अभिषेक कळमकर यांनी तातडीने शुक्रवारी महासभा बोलविली आहे. (प्रतिनिधी)