शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट अनुदान म्हणजे धूळफेक

By admin | Updated: June 6, 2014 01:00 IST

अहमदनगर : केंद्र आणि राज्य सरकारने गारपीटग्रस्तांना केलेली मदत, दिलेले अनुदान ही जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे.

अहमदनगर : केंद्र आणि राज्य सरकारने गारपीटग्रस्तांना केलेली मदत, दिलेले अनुदान ही जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. अन्न सुरक्षा योजनेचा प्रभाव किती पडला हेच कळाले नाही. यामुळे योजनेचे नव्याने मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री गोविंदराव आदिक यांनी व्यक्त केले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आदिक बोलत होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने स्पष्ट कल दिलेला आहे. त्यावर चर्चा करणे चुकीचे असून जनतेच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. आठ दिवसात त्यांच्या कामाचे मूल्यमापन होता कामा नये. लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या अजेंड्यातून शेतकरी आणि कामगार गायब होते. सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणीच या दोन्ही घटकांकडे लक्ष दिलेले नाही. राज्यातील सत्ताधारी पराभवाने पुरते खचून गेले असून यामुळे महाराष्ट्र कृषक समाज या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे आदिक यांनी स्पष्ट केले.कृषक समाज संघटना ही बिगर राजकीय संघटना असून त्यात केवळ सामान्यांचे हित पाहण्यात येणार आहे. यासाठी वेळप्रसंगी राज्यातील सत्ताधार्‍यांशी वैचारिक संघर्ष करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच राज्यातील सर्व पदाधिकार्‍यांचे दोन दिवस मंथन शिबिर नेवासा तालुक्यातील देवगड या ठिकाणी घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांनी भ्रष्टाचार, महागाई, रस्ते, मध्यमवर्गीय यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. मात्र, शेतकरी आणि त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांच्या आत्महत्येवर कोणीच बोलले नाहीत. यामुळे आपण कृषक समाजाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी दादा कळमकर, विनायक देशमुख, डि. एम. कांबळे, वसंत मनकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वेळ आल्यास राष्ट्रवादीशीही लढाशेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर पक्षाच्या व्यासपीठावर मांडले होते. मात्र, त्यास पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या जाहीरनाम्यात या दोन घटकांना प्राधान्य मिळाले नसल्याने आता वेळ आल्यास काँग्रेस आणि स्व पक्षासोबत वैचारिक पातळीवर लढणार असल्याचे आदिक म्हणाले.सरकार योजनेची घोषणा करते. मात्र, तळागाळाजील यंत्रणा काम करत नाही. हाच अनुभव राजीव गांधी जीवनदायी योजना आणि अन्य योजनांच्याबाबत आला आहे.