गुटखा माफियाकडून पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2016 00:03 IST2016-05-04T23:57:17+5:302016-05-05T00:03:00+5:30

जामखेड : गुटखा माफियाला ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात आणत असताना वाटेतच त्याने पोलीस उपनिरीक्षकावर गावठी कट्टा रोखून ट्रेगर दाबला़ त्याचा आवाज आला पण गोळी उडाली नाही.

Gutkha mafia attacks police sub-inspector | गुटखा माफियाकडून पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

गुटखा माफियाकडून पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला

जामखेड : गुटखा माफियाला ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात आणत असताना वाटेतच त्याने पोलीस उपनिरीक्षकावर गावठी कट्टा रोखून ट्रेगर दाबला़ त्याचा आवाज आला पण गोळी उडाली नाही. नंतर आरोपीने पोलीस उपनिरीक्षकाचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी रात्री घडली़ आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री बोर्ले सेवा संस्थेच्या निवडणुकीचा बंदोबस्त आटोपून फरार आरोपीच्या शोधात जामखेड-करमाळा रस्त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे तीन कर्मचाऱ्यांसह जामखेड पोलीस ठाण्यात येत होते़ नान्नज रस्त्यावरील नंदादेवी पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे अ‍ॅपे रिक्षा जात होती. ही रिक्षा थांबवून पोलिसांनी रिक्षातील अनिल सुरेंद्र सानप (रा. सरदवाडी ता. जामखेड) व अविनाश बबन तोंडे (रा़ सतेवाडी ता. जामखेड) यांना विचारले असता त्यांनी रिक्षात गुटखा असल्याचे सांगितले. पोलिसांनी अनिल सुरेंद्र सानप यास पोलीस वाहनात बसवले व दुसरा अविनाश बबन तोंडे यास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण यांच्या दुचाकीवर बसवून जामखेड पोलीस ठाण्यात आणले जात असताना राजेवाडी शिवारात सानप याने त्याच्या ताब्यातील गावठी कट्टा पोलीस वाहनात पुढे बसलेले पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांच्या कानाला लावून गाडी थांबवा नाहीतर ठार मारीन असे म्हणत ट्रेगर दाबला़ पण रिव्हॉल्व्हरमधून गोळी उडाली नाही. तसेच सानप याने दोन्ही हाताने मातोंडकर यांचा गळा दाबला. सानप याने पोलीस कर्मचारी यादव यांच्या डोळ्यावरही ठोसा मारून जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन बुधवारी पोलीस स्टेशनला आणले. न्यायालयाने त्यांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: Gutkha mafia attacks police sub-inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.