शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राम शिंदेंनी नगर जिल्हा परिषदेचा निधी अडविला : कार्ले यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:20 IST

जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्र्यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत.

केडगाव : जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्री राम शिंदे यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत. पालकमंत्री व भाजपाकडून जिल्हा परिषदेत जिरवाजिरवीचे राजकारण सुरु असून यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला.सारोळा कासार (ता. नगर) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ व प्रभावी कामे करणा-या लोकसेवकांचा माजी आमदार दादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण सुरु आहे, परंतु या जिरवाजिरवीमध्ये विकास कामे ठप्प झाल्याने सर्व सामान्य जनता भरडली जात आहे, असा आरोप कार्ले यांनी केला. कार्यक्रमास शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके, खडकीचे सरपंच प्रवीण कोठुळे, बाबुर्डी घुमटचे सरपंच जनार्दन माने, यशवंतराव धामणे, माजी सरपंच भानुदास धामणे, ग्रा.पं.सदस्य नामदेव काळे, गजानन पुंड, स्वाती धामणे, राजाराम धामणे, गोरख काळे, दगडू कडूस, संदीप काळे, रामचंद्र धामणे, विठ्ठल कडूस, शिवाजी धामणे, महेश कडूस, नाथा धामणे, जगन्नाथ कडूस, नानाभाऊ कडूस उपस्थित होते. सुभाष धामणे यांनी सूत्रसंचालन केले. शहाजान तांबोळी यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेzpजिल्हा परिषदBJPभाजपा