शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी अडविला नगर जिल्हा परिषदेचा निधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:09 IST

भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षीय राजकारणामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर नियोजन समितीने निर्णय घेतला नाही, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली आहे.

अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षीय राजकारणामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर नियोजन समितीने निर्णय घेतला नाही, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली आहे.याबाबत नगर जिल्हा परिषदेने नाशिक, औरंगाबाद आणि पुणे जिल्हा परिषदेची माहिती मागविली आहे़ त्यामुळे या निधीवरून पालकमंत्री विरुध्द जिल्हा परिषद असा वाद भविष्यात रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकही मोठे काम सदस्य करू शकले नाहीत. निधीअभावी सदस्यांची कामे खोळंबली आहे़ जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने १५ कोटींचा सुधारित प्रस्ताव नियोजन समितीला पाठविला आहे. परंतु, पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या नियोजन समितीची अद्याप सभा झालेली नाही. सभेसमोर जिल्हा परिषदेचा विषय अंतिम मंजुरीसाठी येणार आहे.मागीलसभेत सदस्यांनी निधीचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत. परंतु, पालकमंत्र्यांनी याबाबत ठोस निर्णय दिला नाही. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निधीसाठी न्यायालयात जाण्याची मागणी सदस्यांनी अध्यक्षांकडे केली होती. त्यापूर्वी इतर जिल्हा परिषदांना निधी दिला आहे किंवा नाही, याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने मागविली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली.न्यायालयात धाव घेतल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री निधी देण्यास राजी झाले. इतर नाशिक व औरंगाबाद जिल्हा परिषदेला जिल्हा प्रशासनाने निधी देण्याबाबत कळविलेले आहे. नगर जिल्हा परिषदेला मात्र वार्षिक योजनेतून निधी मिळाला नसल्याने सदस्यांची कामे थांबली आहेत.जिल्हा वार्षिक योजनेचा निधी यापूर्वी आमदारांना मिळत होता. चालूवर्षीही हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी आमदार आग्रही आहेत. पण, या निधीवर जिल्हा परिषदेने दावा केला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विखे यांच्याकडे आहे. त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निधीसाठी पाठपुरावा केला आहे. पालकमंत्र्यांशीही चर्चा केली. पण, निधी देण्याबाबत निर्णय होत नसल्याने हा निधी जिल्हा परिषद सदस्यांना की आमदारांना मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस