गरजू रुग्णांना युवक पोहोच करतात किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:17+5:302021-05-17T04:19:17+5:30
पारनेर : सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी किराणा जमा केला आणि गरजू कुटुंबाना त्याचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम पारनेर तालुक्यातील ...

गरजू रुग्णांना युवक पोहोच करतात किराणा
पारनेर : सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी किराणा जमा केला आणि गरजू कुटुंबाना त्याचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील आम्ही भाळवणीकर ग्रुपने केला आहे. युवकांच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीमुळे पारनेर तालुक्यात अनेक गरजू कुटुंब सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. भाळवणी येथील युवकांनी एकत्र येऊन गावातील गरजू कुटुंबात किराणा देण्याचा निर्णय घेतला. गंगाराम भाऊ रोहोकले, नानासाहेब रोहोकले, गंगाधर भानुदास रोहोकले, बबलू रोहोकले, संतोष दादा चेमटे, भगाशेठ रोहोकले, संदीप रोहोकले, निशिकांत रोहोकले, संदीप कपाळे, सचिन रोहोकले, सुलतान तांबोळी, प्रमोद जोशी, अमोल रोहोकले यांच्यासह युवकांनी एकत्र येऊन किराणा जमा केला आणि पहिल्याच दिवशी दोनशे कुटुंबांना वाटप केले.
----
‘आम्ही भाळवणीकर’च्या युवकांनी एकत्र येऊन कोरोना महामारीत अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना केलेली मदत ही सामाजिक आदर्श निर्माण करणारी आहे. प्रत्येक गावातील युवकांनी सोशल मीडियाचा उपयोग सामाजिक कामासाठी केल्यास खूप मोठी सामाजिक कामे उभे राहतील.
पोपट पवार,
कार्याध्यक्ष, समृद्ध गाव योजना, महाराष्ट्र
--
फोटो आहे