गवताच्या विषबाधेने ब्राम्हणीत चार जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:52 IST2019-11-16T17:51:48+5:302019-11-16T17:52:10+5:30
ब्राम्हणी व मोकळ ओहोळ परिसरात गवतामुळे जनावरांना विषबाधा झाल्याने शुक्रवारी चार जनावरे दगावली आहेत.

गवताच्या विषबाधेने ब्राम्हणीत चार जनावरे दगावली
ब्राम्हणी / वांबोरी : ब्राम्हणी व मोकळ ओहोळ परिसरात गवतामुळे जनावरांना विषबाधा झाल्याने शुक्रवारी चार जनावरे दगावली आहेत. यापूर्वीही सात जनावरे दगावली होती.
ब्राम्हणी येथील शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर शिरसाठ यांची विषारी गवतामुळे चार जनावरे दगावल्याने पशुपालक शेतक-यांमध्ये घबराट पसरली आहे. यामध्ये संकरित कालवडी व एका बैलाचा समावेश आहे. शिरसाठ यांचे एकूण ६० हजारांचे नुकसान झाले आहे.
सदर मयत जनावरांचे शवविच्छेदन केले असता विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मयत जनावरांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ मेहेत्रे यांनी सांगितले.