आजी-नातवावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:59 IST2017-10-20T03:59:40+5:302017-10-20T03:59:53+5:30

आजारी नातवाला भेटण्यासाठी हळगाव येथील महिला कुटुंबीयांसह जामखेड येथे जात असताना करमाळा रस्त्यावरील सरदवाडी फाट्यानजीक गुरुवारी दुपारी वाहनाला भीषण अपघात झाला.

 The grandmother's time was laid on her grandmother | आजी-नातवावर काळाचा घाला

आजी-नातवावर काळाचा घाला

जामखेड (जि. अहमदनगर) : आजारी नातवाला भेटण्यासाठी हळगाव येथील महिला कुटुंबीयांसह जामखेड येथे जात असताना करमाळा रस्त्यावरील सरदवाडी फाट्यानजीक गुरुवारी दुपारी वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये आजी मीराबाई रामभाऊ मोरे या जागीच ठार झाल्या. तसेच कारमधील पाच जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर तीन तासांनी आजारी नातवाचाही मृत्यू झाला.
संजय रामभाऊ मोरे हे पुणे येथे नोकरीला असून दीपावली सणानिमित्त परिवारासह गावी हळगावला आले होते. त्यांचा मुलगा शिवम (७) आजारी असल्याने त्याला जामखेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी शिवमची प्रकृती बिघडल्याने वडील रामभाऊ मोरे व मीराबाई अन्य दोन नातवांना व नातेवाइकांना सोबत घेत जामखेडला खासगी वाहनाने निघाले होते. करमाळा जामखेड रस्त्यावरील सरदवाडी फाट्याच्या पुढे असलेल्या चढणीवर अचानक गुरांचा कळप गाडीला आडवा आला. जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात गाडी उलटून सात फूट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात मीराबाई (५५) या जागीच मृत झाल्या. रामभाऊ (६०) नातेवाईक आप्पासाहेब शिंदे (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. तसेच काही वेळातच शिवम याचाही मृत्यू झाला.

Web Title:  The grandmother's time was laid on her grandmother

टॅग्स :Deathमृत्यू