शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-कार अपघातात आजोबा-नातवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

शेवगाव : दुचाकी- कार अपघातात आजोबा- नातवाचा मृत्यू झाला. आजी गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी ...

शेवगाव : दुचाकी- कार अपघातात आजोबा- नातवाचा मृत्यू झाला. आजी गंभीर जखमी असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाट्याजवळील दत्तपाटी येथे हा अपघात घडला.

अपघातात दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय ५३), प्रथमेश प्रमोद आरगडे (वय ६, दोघेही रा. सौंदाळा, ता. नेवासा), असे निधन झालेल्या आजोबा, नातवाचे नाव आहे. मीनाबाई दुर्योधन आरगडे (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सौंदाळा येथील दुर्योधन आरगडे हे पत्नी मीनाबाई, नातू प्रथमेश यांच्यासह मुलीला भेटण्यासाठी वरूर (ता. शेवगाव) येथे आले होते. मुलीची भेट घेऊन शुक्रवारी (दि.२३) ते वरूर येथून सौंदाळा येथे चालले होते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेवगाव- नेवासा राज्यमार्गावर दत्तपाटीनजीक त्यांच्या दुचाकीला नेवासामार्गे येणाऱ्या कारने समोरून जोराची धडक दिली. अपघाताची माहिती समजताच त्यांच्या नातेवाइकांसह इतरांनी जखमींना तातडीने उपचारार्थ शेवगाव येथील रुग्णालयात हलविले; परंतु तत्पूर्वीच प्रथमेश आरगडे याचा मृत्यू झाला.

त्याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्योधन व मीनाबाई यांना पुढील उपचारार्थ नगर येथे घेऊन येताना दुर्योधन आरगडे यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मीनाबाई आरगडे याही गंभीर जखमी असून, त्यांच्यावर विळद घाटातील रुणालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

---

२४ दुर्योधन आरगडे, २४प्रथमेश आरगडे