शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ॲसिड हल्ला पीडितेचा उपचार खर्च सरकार करणार, कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांकडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 07:21 IST

बुधवारी विधानसभेत या घटनेचा मुद्दा उपस्थित झाला. याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, नाना पटोले आणि अस्लम शेख यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला लक्ष केले. 

मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहावीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल असे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

बुधवारी विधानसभेत या घटनेचा मुद्दा उपस्थित झाला. याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, नाना पटोले आणि अस्लम शेख यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला लक्ष केले. 

आरोपीच्या शोधासाठी गावकऱ्यांची मदत ज्या तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले. हा तरुण वडगावपान गावातीलच असावा, असा संशय असून आरोपीच्या शोधासाठी गावकऱ्यांची मदत घेतली जात आहे. मुलीवर सध्या प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या उपचारांचा शंभर टक्के खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहितीही विखे-पाटील यांनी दिली. 

प्लास्टिक सर्जरी करावी लागणार, मुंबईत आणावेआमदार नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृहविभाग व सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.

अकरा वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात तिचे उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथकेसंगमनेर तालुका पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. अद्यापपर्यंत आरोपी उघड झालेले नाहीत, असे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हार-घोटी राज्यमार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात मागील चार वर्षांत सातशे चिमुकल्या अत्याचाराच्या बळी ठरल्या असून, चालू वर्षात मागील दोन महिन्यांत हा आकडा ४० वर पोहोचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Government to Cover Acid Attack Victim's Costs; Opposition Criticizes Law

Web Summary : The government will cover all treatment costs for the acid attack victim in Ahilyanagar. The opposition has criticized the state's law and order situation after the incident, demanding accountability as the accused remains at large. Police have launched a search, while villagers protest.
टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhilyanagarअहिल्यानगर