सरकारी वकिलाचा बंगला फोडून चोरले ५० तोळ्याचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 18:14 IST2021-02-08T18:13:31+5:302021-02-08T18:14:07+5:30
अहमदनगर : शहरात चोऱ्या, घरफोडीच्या घटना सुरूच असून रविवारी भरदिवसा चोरट्यांनी सरकारी वकिलाचा बंगला फोडून तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सरकारी वकिलाचा बंगला फोडून चोरले ५० तोळ्याचे दागिने
अहमदनगर : शहरात चोऱ्या, घरफोडीच्या घटना सुरूच असून रविवारी भरदिवसा चोरट्यांनी सरकारी वकिलाचा बंगला फोडून तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. शहरातील कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी ॲड. गोरक्षनाथ काशीनाथ मुसळे (वय ५३) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसळे हे रविवारी दुपारी कुटुंबीयांसमवेत श्रीगोंदा येथे गेले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे घरकाम करणाऱ्या महिलेने मुसळे यांच्या घरातील काम आटोपून ती ३.३० वाजता घर बंद करून निघून गेली. त्यानंतर चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील बेडरुममधील ड्राॅवरमध्ये ठेवलेेले ५० तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. मुसळे हे सायंकाळी ५.३० वाजता घरी आले तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.