शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लॉकडाऊनमध्ये सरकारची पणन व्यवस्था अपयशी : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:30 IST

कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. 

राहाता : कोरोना संकटाच्‍या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. राहाता कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीने लॉकडाऊनच्‍या काळातही शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करण्‍यासाठी निर्माण केलेली व्‍यवस्‍था ही शेतक-यांना दिलासा देणारी ठरली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासन नियमाचे पालन करुन शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी केला. याचा लाभ नगर जिल्‍ह्यासह शेजारील जिल्‍ह्यातील शेतक-यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदी कांदा खरेदी मार्केटही सुरु केले. आ.राधाकृ‍ष्‍ण विखे यांनी रविवारी बाजार समितीच्‍या आवारात कांदा उत्‍पादक शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या पदाधिका-यांची सदिच्‍छा भेट घेवून त्‍यांच्‍याशी संवाद साधला. शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या व्‍यवस्‍थापनासमोर असलेल्‍या अडचणी जाणून घेतल्‍या. समितीत आलेल्‍या कांदा पिकाची पाहाणी करुन मिळत असलेल्‍या भावाबाबतही त्‍यांनी जाणून घेतली.कोरोनाने संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहिला म्‍हणूनच शेती उत्‍पादीत मालाचा पुरवठा होवू शकला. पण यासाठी शेतक-यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे  लागले. शासनाच्‍या पणन विभागाची निष्‍क्रीयता याला कारणीभूत ठरली. शासनाच्‍या अखत्‍यारीत येणाºया एकाही व्‍यवस्‍थेने शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी करण्‍याची इच्‍छाशक्‍ती दाखविली नाही. शासनाने शेतक-यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर माल रस्‍त्‍यावर फेकून देण्‍याची वेळ आली नसती. पण दुर्दैवाने सरकारच्‍या पणन विभागाला याचे महत्‍व समजले नाही. राज्‍यातील बाजार समित्‍या नियोजनपूर्व सुरु ठेवल्‍या असत्‍या तर शेतकºयांना बाजारपेठ मिळाली असती. सध्‍या उपलब्‍ध असलेला भाजीपाला शेतक-यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही. कांदा उत्‍पादकांनीही उत्‍पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही. त्‍यामुळे भवि‍ष्‍यात भाजीपाल्‍याबरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्‍याची भीती विखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMarket Yardमार्केट यार्ड