शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याच्या मातीतले सुवर्ण

By admin | Updated: December 14, 2015 20:38 IST

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील आठ खेळाडूंनी कठोर परिश्रम घेत राष्ट्रीय व राज्य ग्रामीण मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सवरेत्तम कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे

बाळासाहेब काकडे - श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील आठ खेळाडूंनी कठोर परिश्रम घेत राष्ट्रीय व राज्य ग्रामीण मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सवरेत्तम कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. या खेळाडूंच्या सुवर्णझेपमुळे महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर मान उंचावली आहे. पु णे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण मैदानी स्पर्धेत राहुल जाधव याने ४00 मीटर हर्डल्स स्पर्धेत सुवर्णपदक, अनिल पवार याने ८00 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक, स्वप्नील गव्हाणे याने १५00 मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक, प्रमोद आहेर याने ११0 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक, १९ वर्षापुढील क्रीडा स्पर्धेत हर्षद चौकडे याने २00 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक, विठ्ठल पवार याने ८00 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक तर सचिन जाधवने २१ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत पदकांची कमाई करीत सुवर्ण कामगिरी केली. नारायण घुगे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.गोवा येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करण्यासाठी या सात खेळाडूंची टीम सज्ज झाली असून, भल्या पहाटे उठून हे खेळाडू सराव करीत आहेत. या खेळाडूंना क्रीडा संचालक सतीश चोरमले, प्रा. नामदेव शेलार, प्रा.महेश गिरमकर हे मार्गदर्शन करीत आहेत.दज्रेदार खेळाडू तयार करण्यासाठी सेवानवृत्त क्रीडा संचालक शिवाजीराव कदम यांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, हर्डल्स या मैदानी स्पर्धांची तयारी करुवून घेत असून टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन या इनडोअर खेळांसाठी ते खेळाडूंना मार्गदर्शन करतात.सुवर्णपदक विजेत्या खेळाडू हे सर्वसामान्य घरातील असून, खेळ, शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या घरांमधील ही मुले आहेत. घरचे वातावरण चांगले नाही, कोणत्याही सुविधा नसताना केवळ श्रम आणि मार्गदर्शनाच्या बळावर या खेळाडूंनी श्रीगोंद्याचा खेळाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वंदू गिरी, शंकर राऊत, सतीश म्हस्के, सोनल बोरुडे, कोमल जाधव, स्वप्नील ढवळे, रवींद्र काळाणे यांनी अनेक मैदाने गाजविल्याचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. खेळातील कौशल्यामुळे या सातही विद्यार्थ्यांचे लाईफस्टाईल बदलले आहे.या खेळाडूंचा आदर्श घेऊन इतर खेळाडूंनीही मैदानात नियमीत सराव करायला हवा. खेळामुळे शरीर सुदृढतेसह अनेक फायदे होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सकाळी किमान एक तास तरी रोज सराव करावा, असे हे खेळाडू सांगतात. बाळासाहेब काकडे चपळाईने खेचून आणले सुवर्ण■ बाबुर्डीचा प्रमोद आहेर हा उंचीने अतिशय छोटा आहे. परंतु अंगात कमालीची चपळाई आहे. त्यामुळे त्याची पावले सुवर्णाचा वेध घेतात. त्याने कमी उंचीचा न्यूनगंड न बाळगता अनेकाने मागे टाकीत पदकावर नाव कोरण्याची किमया केली. आता त्याला राष्ट्रीय स्पर्धा खुणावत आहे. काम करुन शिक्षण■ बेलवंडी येथील अनिल पवार या खेळाडूकडे एस.टी.च्या पासला पैसे नसतात. सुट्टीत काम करून पैसे कमवितो आणि कमविलेल्या पैशातून शिक्षण करीत अनिल पवारची धेय्याकडे वाटचाल सुरु आहे. राहुल जाधव विठ्ठल पवार सचिन जाधव स्वप्नील गव्हाणे