पावसातही ‘भेटी-गाठी’

By Admin | Updated: October 7, 2014 23:51 IST2014-10-07T23:36:37+5:302014-10-07T23:51:43+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत.

'Gifts and Bales' in the Rain | पावसातही ‘भेटी-गाठी’

पावसातही ‘भेटी-गाठी’

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत. चारही प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे मानून प्रचारात गुंग झाले आहेत. रात्रंदिवस सुरू असलेल्या प्रचारात दोन दिवसांपासून रात्री पडणाऱ्या पावसाचा अडसर येत आहे. मात्र, त्याची तमा न बाळगता उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.
आॅक्टोबर हिट आणि निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. ‘रात्र थोडी सोंगे फार’अशी अवस्था उमदेवार आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. प्रचार, व्यक्तिगत गाठीभेटी यांच्या सोबत नेत्यांच्या जाहीर सभा यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. त्यात दिवसा चटकणारे ऊन आणि रात्रीच्या वेळी पडणाऱ्या पावसामुळे उमेदवारांचे हाल होतांना दिसत आहे.
सोमवारी आणि मंगळवारी रात्री उशिरा नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून रब्बीच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी उमेदवारांची धावपळ झालेली दिसली. सर्वच पक्षाच्या सध्या दररोज सकाळी आणि सायंकाळी उशिरा प्रचार फे ऱ्या सुरू आहेत. त्यात पाऊस होत असल्याने प्रचारकांच्या अडचणी वाढत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: 'Gifts and Bales' in the Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.