काँग्रेसच्या गौराबाई जाटवे भाजपामध्ये
By Admin | Updated: January 13, 2023 18:43 IST2014-05-03T13:23:37+5:302023-01-13T18:43:43+5:30
प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव व प्रदेश काँग्रेसच्या सदस्या गौराबाई जाटवे यांनी नुकताच आपल्या समर्थक महिला कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.

काँग्रेसच्या गौराबाई जाटवे भाजपामध्ये
औरंगाबाद : प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव व प्रदेश काँग्रेसच्या सदस्या गौराबाई जाटवे यांनी नुकताच आपल्या समर्थक महिला कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. राष्ट्रीय चर्मकार महिला आघाडीच्या जाटवे मराठवाडा अध्यक्षा असून, त्यांच्यासमवेत अनुसया तटवारे, मथुरा जाटवे, संगीता सुलाने, भागाबाई रमंडवाल, रंजना रमंडवाल, सविता रमंडवाल, कमलाबाई हनवते, लक्ष्मीबाई बताडे, संगीता दुधाणे, रामकोरबाई जाधव, कमलाबाई रेसवाल आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.