शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस टाकीच्या स्फोटाने घराचे पत्रे उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:02 IST

बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यात वसंतराव सोनार यांच्या राहत्या घराच्या पत्र्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला. यात वसंतराव सोनार यांच्या राहत्या घराच्या पत्र्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. नशीब बलवत्तर असल्याने जीवितहानी टळली. बालमटाकळी येथील सोनार गल्लीतील वसंतराव सोनार यांच्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्वयंपाक सुरु असतांना गॅसची गळती झाल्याने टाकीने अचानक पेट घेतला. कुटुंबातील व्यक्ती घाबरून घराबाहेर पळाल्यानंतर काही वेळातच गॅस टाकीने पेट घेऊन मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. स्फोटामुळे घराचे पत्रे तुटून बाजूला फेकले गेले. घरातील संसारोपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुमारे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच घराच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले. कुटुंबातील व्यक्ती जागे असल्यामुळे घराबाहेर पडल्याने जीवित हानी टळली. त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तलाठी के. बी. शिरोळे, बोधेगाव दूरक्षेत्राचे हेडकाँस्टेबल वामनराव खेडकर, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या वितरकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सोनार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)