Ahmednagar: गांजाची नशा पडली महागात, चार जणांना केली अटक
By अण्णा नवथर | Updated: February 15, 2024 13:57 IST2024-02-15T13:56:22+5:302024-02-15T13:57:19+5:30
Ahmednagar: अहमदनगर - शहरात गेल्या काही दिवसांपासून गांजा पिऊन रात्रीच्यावेळी नागरिकांना त्रास देणाऱ्या तिघा जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन जेलमध्ये डांबले आहे. त्यामुळे गांजाची नशा या तिघांना चांगलीच महामागात पडली आहे.

Ahmednagar: गांजाची नशा पडली महागात, चार जणांना केली अटक
- अण्णा नवथर
अहमदनगर - शहरात गेल्या काही दिवसांपासून गांजा पिऊन रात्रीच्यावेळी नागरिकांना त्रास देणाऱ्या तिघा जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन जेलमध्ये डांबले आहे. त्यामुळे गांजाची नशा या तिघांना चांगलीच महामागात पडली आहे. या कारवाईने चोरी छुपे नशा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांच्या पथक रात्रीची गस्त घालत असताना क्लेरा ब्रुस, कोठी आणि बॉईज हायस्कुल परिसरात काही जण रात्रीच्यावेळी गांजा पिऊन गोंधळ घालताना आढळून आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अमोल प्रदीप कदम ( वय २४, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, नगर ), योगेश राम सटाले ( वय २९, रा. चिपाडेमळा, सारसनगर), अनिकेत शंकर वाकळे ( वय २१, काटवनखंडोबा परिसर), सोनाथ राजू केदारे ( वय २०, रा. गांधीनगर, बोल्हेगाव ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. हे रात्रीच्यावेळी गांजा पिताना आढळून आली असून, त्यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही कोतवाली पोलिसांनी पुणे बसस्थानक परिसरात गांजा पिणाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली होती.