गंधे, मुंडे, गोंदकर भाजपचे जिल्हाध्यक्ष; हरिभाऊ बागडे यांची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:44 IST2020-01-13T12:43:18+5:302020-01-13T12:44:30+5:30

भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी   अरुण मुंडे  तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Gandha, Munde, Gondkar BJP district president; Announcement of Haribhau Baghde | गंधे, मुंडे, गोंदकर भाजपचे जिल्हाध्यक्ष; हरिभाऊ बागडे यांची घोषणा 

गंधे, मुंडे, गोंदकर भाजपचे जिल्हाध्यक्ष; हरिभाऊ बागडे यांची घोषणा 

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी   अरुण मुंडे  तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतची घोषणा पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी आज केली.
अहमदनगर येथे तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाकरता ३९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिभाऊ बागडे यांनी काम पाहिले होते. आजी, माजी जिल्हाध्यक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. यावेळी भाजपचे नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची नगर शहर व दक्षिण, उत्तर  अशी विभागणी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी शहराध्यक्षपद स्वतंत्र आहे.  ग्रामीण भागाकडे दोन जिल्हाध्यक्ष यावेळेला पक्षाने दिले आहेत. महेंद्र उर्फ भैय्या गंधे हे विद्यमान नगरसेवक असून अरुण मुंडे हे भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत.

Web Title: Gandha, Munde, Gondkar BJP district president; Announcement of Haribhau Baghde