शेवगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटरला निधी मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:23+5:302021-04-19T04:18:23+5:30
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शुक्रवारी (दि.१६) आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ...

शेवगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटरला निधी मिळावा
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शुक्रवारी (दि.१६) आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित आमदारांना आपापल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील आमदार नीलेश लंके यांनी पारनेर येथे कोविड सेंटर उभारले आहे. आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे आदींनी मतदारसंघात आमदार निधीतून कोविड केअर सेंटरला निधी दिला आहे. मात्र शेवगावला अद्याप आमदार निधीतून एक रुपया निधी मिळाला नाही. त्यामुळे शेवगाव तालुका मतदारसंघात आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी खोचक टीका राजळे यांचे नाव न घेता घुले यांनी केली आहे.
घुले म्हणाले, कोरोनाचे संकट गंभीर रूप धारण करीत असताना सामाजिक जाणिवेतून विविध संघटना, नागरिक, कोविड केअर सेंटरच्या मदतीसाठी पुढे सरावले आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या पुढे ऐच्छिक रक्कम जमा करून या आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याचबरोबर शहरातील विविध घटकांकडून आर्थिक मदत गोळा केली जात आहे. आमदारांनी आमदार निधीतून शेवगाव साठ ते सत्तर लाख तालुक्यांच्या वाट्याचा निधी देणे अपेक्षित होते. परंतु अद्याप निधी मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तो तत्काळ द्यावा.