कर्जतमध्ये मोर्चा, पुतळ्याचे दहन
By Admin | Updated: September 28, 2016 00:00 IST2016-09-28T00:00:58+5:302016-09-28T00:00:58+5:30
कर्जत : जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले

कर्जतमध्ये मोर्चा, पुतळ्याचे दहन
कर्जत : जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांसाठी कर्जत तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. कर्जत तालुका वृद्ध भूमिहीन महिला संघटना व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयावर अध्यक्ष शब्बीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
मराठी शाळेपासून सुरु झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तेथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोर्चा तहसील कार्यालयात गेल्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, कर्जत नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती मनीषा सोनमाळी, नगरसेवक सचिन घुले, संयोजक शब्बीर पठाण यांची भाषणे झाली. यावेळी आशा क्षीरसागर,फिरोज पठाण, सुनील यादव, भा. को. साळवे, हिरामण येळपणेकर, सोमनाथ भैलुमे आदी हजर होते. तहसीलदार किरण सावंत पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
(तालुका प्रतिनिधी)