कोरोनाने निराधार झालेल्यांना मोफत बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:43+5:302021-06-23T04:14:43+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी रुईगव्हाण या गावची निवड करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील ...

कोरोनाने निराधार झालेल्यांना मोफत बियाणे
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी रुईगव्हाण या गावची निवड करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील पंधरा कुटुंबे निराधार झाली होती. कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे व तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामधून पंधरा कुटुंबांना १५० किलो उडीद बियाणे मोफत वाटप करण्यात आले. ३० एकर क्षेत्रावर याची पेरणी करण्यात आली. कृषी विभागाने रुईगव्हाण गावातील निराधार कुटुंबांना मदतीचा हात दिला, याबद्दल ग्रामस्थांनी कृषी विभागाचे आभार मानले. यावेळी मंडल कृषी अधिकारी हिंदुराव मोरे, कृषी पर्यवेक्षक विकास सुपेकर, कृषी सहायक विकास तोरडमल, सरपंच रोहिनी पवार, उपसरपंच दत्तात्रय जामदार, अशोक पवार, नृसिंह पवार, सुनील पवार, राजेंद्र पवार, गणेश जामदार, प्रकाश जामदार, बारकू काळे, आदी उपस्थित होते.
............
फोटो ओळी - कर्जत तालुक्यातील रुई गव्हाण येथील निराधार कुटुंबांना खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी उडीद बियाणांचे वाटप करताना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी.