शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी ( दि.०८) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलीस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलीस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले हे आरोपी आहेत. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
संगमनेर कारागृहातून चार कैदी पळाले; चौघांवरही होती गंभीर गुन्ह्यांची नोंद
By शेखर पानसरे | Updated: November 8, 2023 10:08 IST